Maharashtra Politics : अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

Maharashtra Politics : अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

Ajit Pawar व Eknath Shinde यांच्या भेटीने राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Published on

मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) देशभरात आज मतदान सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसोबत एकनाथ शिंदे यांची भेट घेतेली आहे. यामुळे राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Maharashtra Politics : अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
Presidential Election LIVE : राष्ट्रवादीच्या आमदाराने केले द्रौपदी मुर्मू यांना मतदान

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएकडून द्रौपदी मुर्मू व युपीएकडून यशवंत सिन्हा हे आमनेसामने आहेत. या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली असून भाजपच्या नेत्यांनी मुर्मू याच जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केले आहे. तसेच, या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी मुर्मंना मतदान करणार असल्याता दावा भाजपने केला आहे. अशातच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु होत आहेत. परंतु, ही भेट केवळ नगर विकास विभागाच्या कामांना स्थगिती दिल्याने घेतली असल्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी सांगितले आहे.

Maharashtra Politics : अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
Mumbai : भाजप महिला नेत्यावर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार काळात अर्थ विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे. त्यातील एकट्या बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते. शिंदे सरकारचा हा निर्णय अजित पवार यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com