Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी काल कोरोनाची चाचणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काल मी कोरोनाची (corona) चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. अशी माहिती त्यांनी स्वत:हा दिली आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घेण्याच्या सुचना देखील यावेळी अजित पवार यांनी दिल्या आहेत. (Ajit Pawar infected with corona, health stable)
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता आठवडा पूर्ण झाला आहे. या काळात शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, मंत्री शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेना आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तर राष्ट्रवादीनेही (NCP) आपली भूमिका स्पष्ट करत आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता केवळ आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) ठाकरे गटात राहिले आहेत. दरम्यान, शिंदे ठाकरे वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. दोन्ही गटांनी आपल्यासाठी दिग्गज वकिलांची फौज उभी केली आहे.
दरम्यान, यानंतर आषाढीची पुजा कोण करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्तेच आषाढीची पुजा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, की आषाढी एकादशीच्या महापुजेचा मान महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे. अशी माहिती सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया देताना मिटकरी यांनी दिली आहे.