राजकारण
Ajit Pawar : गुजरातकडे जाणारं अतिरीक्त पाणी मराठवाड्यात वळवण्याचा आमचा विचार
छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून कॅबिनेटची बैठक होत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून कॅबिनेटची बैठक होत आहे. 2 दिवस ही बैठक चालणार असून या बैठकीसाठी पूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालं आहे. तब्बल 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, अडचणीतील शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने एक रुपयात पिक विमा सुरु केला आहे. कृषीमंत्र्यांनी सूचना देखील दिल्या आहेत. स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा दिल्लीत उभा रहावा अशी माझी इच्छा आहे.
तसेच गुजरातकडे जाणार अतिरीक्त पाणी मराठवाड्यात कसं वळवता येईल हा आमचा विचार आहे. पालघर आणि ठाण्यातील पाणीही वळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे अजित पवार म्हणाले.