भरसभेत अजित पवार चुकले अन् खळखळून हसले

भरसभेत अजित पवार चुकले अन् खळखळून हसले

अजित पवारांनी बारामतीत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांविषयी सूचना देत सज्जड दमही दिला आहे.
Published on

बारामती : बारामती येथे राष्ट्रवादी भवनामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. या भाषणादरम्यान अजित पवारांच्या तोंडून अध्यक्ष महोदय हा शब्द निघाला. ही चूक त्यांच्या लक्षात येताच सवयीचा परिमाण फार वाईट असतो, असे म्हणत अजित पवार खळखळून हसले. तर, सभागृहातही एकच हशा पिकला. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांविषयी सूचना देत सज्जड दमही दिला आहे.

भरसभेत अजित पवार चुकले अन् खळखळून हसले
रामनवमी भारतात नाही तर पाकिस्तानात साजरी करायची का? मनसेचा फडणवीसांना संतप्त सवाल, नेमके प्रकरण काय?

बारामती येथे राष्ट्रवादी भवनामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात खाली बसलेल्या एका कार्यकर्त्याने उशिरा आल्याबद्दल माफी मागितली. त्यावर अजित पवारांनी हात जोडत माफ केले, असे म्हणाले. याच दरम्यान भाषणाची लिंक विसरली गेली आणि अजित पवारांच्या तोंडून अध्यक्ष महोदय हा शब्द निघाला. नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय हा शब्द वळणी पडल्याने अजित पवारांच्या तोंडून हा शब्द निघाला. ही चूक त्यांच्या लक्षात आली व सभागृहात एकच हशा पिकला. अजित पवार देखील खळखळून हसले व सवयीचा परिणाम फार वाईट असतो, असे म्हणाले.

तर, अजित पवारांनी सध्या कार्यरत असलेल्या बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांना अशी सूचना केली की, प्रत्येक बूथप्रमुखांनी २५ कुटुंबाशी समन्वय वाढवा आणि त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या तालुकाध्यक्षांना सांगा. आणि समन्वय ठेवा. बाकीचं काही करू नका. माझ्यापर्यंत तक्रारी येतील असे काही करू नका. व्हाट्सअप मेसेज पाठवू नका. ओळख झाली म्हणून मेसेज पाठवतो तसला चावटपणा अजिबात चालणार नाही. नाहीतर नको तेवढा संपर्क होईल आणि पक्षाचा फायदा होण्याऐवजी तोटा होईल, अशी तंबी देखील अजित पवारांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com