राजकारण
अजित पवार गटाला ट्विटरचा धक्का; ट्विटर हॅण्डल सस्पेंड
अजित पवार गटाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.
अजित पवार गटाचे ट्विटर हॅण्डल सस्पेंड करण्यात आले आहे. राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार गटाकडून ट्विटरचे एक नवीन अकाऊंट NCPspeaks_official असे तयार करण्यात आले होते. मात्र आता ट्विटरने हे अकाऊंट सस्पेंड केले आहे. शरद पवार गटाकडून या ट्विटर हँडलवर दावा केल्यानंतर आणि तक्रारीनंतर ते निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार आणि अजित पवार दोन्ही पक्षांचे ट्विटर अकाउंट आणि बायो सारखेच असल्याने अजित पवार गटाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते आहे.