अजित पवार गटाचे पदाधिकारी सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यात; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात

अजित पवार गटाचे पदाधिकारी सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यात; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात

अजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादीत उभी फूट पडली. यामुळे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत
Published on

बारामती : अजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादीत उभी फूट पडली. यामुळे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. तर, शपथविधीमध्ये उपस्थित असलेले अनेक नेते नंतर शरद पवार यांच्यासोबत दिसून आले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच, अजित पवार गटाचे पदाधिकारी सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिसल्याने या संभ्रमावस्थेत आणखी भर पडली आहे.

अजित पवार गटाचे पदाधिकारी सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यात; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात
महाराष्ट्र कॅसिनो कायदा अखेर रद्द; मंत्रिमंंडळाचे 9 महत्वाचे निर्णय

राष्ट्रवादी फुटीनंतर खासदार सुप्रिया सुळे या तब्बल दीड महिन्यानंतर बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी सुप्रिया सुळेंसोबत बारामती नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव आणि अजित पवारांचे विश्वासू मानले जाणारे किरण गुजर हे देखील होते. बारामती नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष बाळासो जाधव, मार्केट कमिटीचे संचालक शुभम ठोंबरे, ऋतुराज काळे, ऋषी देवकाते तसेच राष्ट्रवादी युवती अध्यक्ष भाग्यश्री हे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी किरण गुजर यांच्या नटराज नाट्य दालनाला भेट देत त्यांच्याशी बातचीत केली. अजित पवारांचे पदाधिकारी सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यात दिसून आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात गुप्त भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांच्या कृतीला शरद पवारांचा छुपा पाठिंबा आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावर अजित पवार आणि शरद पवार यांनी अनेकदा स्पष्टीकरण देत कौटुंबिक भेट असल्याचे सांगितले आहे. मात्र, चर्चा काही थांबायचे नाव घेत नाहीयं. तर या भेटीमुळे महाविकास आघाडीतही शरद पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com