Ajit Pawar : उपमुख्यमंत्र्यांकडे एकही खाते नाही, सर्व मुख्यमंत्र्याकडे
मुंबई : शिंदे सरकारचा (Shinde Government) शपथविधी होऊन एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. कुठे अडलय माहित नाही. का दिल्लीतून संकेत मिळत नाही, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार (AJit Pawar) यांनी लगावला आहे. सर्व खात्याचे अधिकार आज फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेही एकही खाते नाही, असे म्हणून अजित पवांरानी फडवीसांना चिमटा काढला आहे.
अजित पवार म्हणाले, राज्यभरात अतिवृष्टी झाली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. परंतु, राज्य शासनाची यंत्रणा हलतच नाहीये. बीड, लातूर व उस्मानाबाद येथे पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. असे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडले आहे. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी दौरा केला. परंतु, त्यानंतर ते बैठकांमध्ये व्यस्त झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
राज्यात 10 लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे कृषी क्षेत्राने व शासनाने तातडीने हस्तक्षेप करायला पाहिजे व सूचना दिल्या पाहिजेत. नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. अशात काही ठिकाणी तात्काळ आर्थिक मदत मिळायला पाहिजे. ती मिळत नाहीये. तर, अतिवृष्टीमुळे 110 नागरिकांचा जीव गेला. त्यांना 4 लाखांची मदत मिळाली. मात्र, ही मदत तुंटपुंजी आहे. पशूधनाची हानी झाली.त्याची मदत मिळाली नाही. अनेकांच्या घराची पडझड झाली असून अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने लक्ष दिले पाहिजे, असे पवारांनी म्हंटले आहे.
शपथविधी होऊन एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. कुठे अडलय माहित नाही. का दिल्लीतून संकेत मिळालेले नाही, असा टोला अजित पवार यांनी शिंदे सरकारला लगावला. तसेच, सर्व खात्याचे अधिकार आज फक्त मुख्यमंत्री शिंदे यांच्यांकडे आहेत. उपमुख्यमंत्र्यांकडेही खाती नाहीत. यामुळे अनेक फाईल अडकल्या आहेत. सरकारचा गतीने कारभार झाला पाहिजे. आणि जनेतेचे प्रश्न सुटले पाहिजे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे कार्यंकर्त्यांचे सत्कार स्वीकारत आह. परंतु, शिंदेंनी याला दुसऱ्या स्थानावर ठेवायसा पाहिजे. व पहिले प्राधान्य जनतेचे-शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे. परंतु, दुर्देवाने मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारत आहेत. त्यांचे संवेदशून्यचे दर्शन आहे, अशी टीका पवारांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणते कार्यक्रम घ्यावेत हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. परंतु, 10 वाजल्यानंतर मुख्यमंत्री असो किंवा आणखी कोणी माईक बंद करायचा असतो. जर राज्याचे प्रमुखच नियम तोडत असतील तर पोलिसही काय करणार? त्यांना आदेश देणारेच घटना पायदळी तुडवत असतील तर हे चुकीचे आहे. हे महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिले नव्हते. मुख्यमंत्र्यांनी उत्साही कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
पालकमंत्र्यांचीही पण तुम्ही नेमणूक करत नाही. अतिृष्टी आणि पूरग्रस्त दौऱ्यावेळी अनेक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी विनंती केली होती. तसेच, अतिृष्टी, पूरग्रस्त भागातील शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशीही मागणी केली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.न