अजित पवार यांच्या पाया पडल्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
कराडमधील प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवारांच्या पाया पडून नमस्कार केला. यशवंतराव चव्हाण यांचा आज 40 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त कराडमधील प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी अजित पवार आणि रोहित पवार देखील आले होते.
यावेळी रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. याच पार्श्वभूमीवर या भेटीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, माझे ते काका आहेत. म्हणून मी पाया पडलो. विचारांमध्ये भिन्नता आतातरी आहे. माझ्या 19च्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती.
माझे काका असल्यामुळे संस्कृतीप्रमाणे पाया पडण्याची जबाबदारी आहे. कारण ही जी भूमी आहे चव्हाण साहेबांचे स्मृती ठिकाण आहे. या भूमीमध्ये कुठलाही भेदभाव करुन चालत नाही. इथं संस्कृती पाळणं फार महत्वाचे आहे. आम्ही तरी पाळतो. तेच त्याठिकाणी मी केलेलं आहे. असे रोहित पवार म्हणाले.
यातच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. कर्जत-जामखेडमध्ये महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला.