राजकारण
निलंबनानंतर जयंत पाटील मतदारसंघात, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
शनिवार आणि रविवारी अधिवेशन नसल्याने जयंत पाटील हे सांगलीत परतले आहेत.
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच शिंदे- फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. मात्र, या अधिवेशात सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. परंतु, विधानसभेत अपशब्द उच्चारल्यामुळे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नागपूर हिवाळी अधिवेशनापर्यंत निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे एकच राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर ते पहिल्यांदाच इस्लामपूर मतदारसंघात परतले आहे. त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.
जयंत पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यानंतर राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी इस्लामपूर, वाळवा आणि मिरज तालुक्यातील सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.