Sharad Pawar Home Department
Sharad Pawar Home Department Team Lokshahi

पवारांच्या नाराजीनंतर गृहखात्याचा मोठा निर्णय, 'त्या' सुरक्षा रक्षकांवर होणार कारवाई

पोलीस सुरक्षा रक्षकांवर होणार कारवाई
Published by :
Shubham Tate
Published on

Sharad Pawar Home Department : महाराष्ट्राच्या राजकारणात आता प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते बंडखोर आमदार महाराष्ट्रात सत्ता बदलासाठी तिकडे गुहागरमध्ये रणनीती आखत आहेत. ते विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याच्या तयारीत आहेत. तर इकडे महाविकास आघाडी सरकारदेखील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी रणनीती आखताना दिसत आहे. (After Sharad Pawar's displeasure, a big decision of the Home Department)

Sharad Pawar Home Department
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची सेना ताब्यात घेऊ शकणार का ? काय आहे शिवसेनेची घटना ?

दरम्यान, अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यात दोन बैठका पार पडल्या आहेत. शिवसेनेचे जवळपास चाळीस आमदार आणि काही मंत्री हे अर्ध्या रात्री महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातला गेले आणि तिथून त्यांनी बंडाच हत्यार उगारले आहे. हे सर्व आमदार आणि मंत्री हे गुजरात पोलिसांच्या बंदोबस्तात गुवाहाटीपर्यंत पोहोचले आहेत.

Sharad Pawar Home Department
सुशांत सिंग हत्येप्रकरणी पुरावे नष्ट करणार्‍यांना योग्य ती शिक्षा, भाजप नेत्याची टीका

एवढे सगळे आमदार बाहेर जातात आणि महाराष्ट्र पोलिसांना साधा काणोसही लागत नाही? आमदार, नेते, खासदार यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकांनी कोणतीही माहिती गृहाखात्याला न दिल्याने या सर्व पोलीस सुरक्षा रक्षकांवर कारवाई होणार असल्याची माहिती ही विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. आता नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com