आव्हाडांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, हे राज्य कायद्याचं...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या विनयभंगाच्या आरोपांमुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यामुळे आमदार आव्हाड यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. आव्हाडांच्या अश्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर अनेक मोठा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट देऊन समजूत काढली. मात्र, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. त्यावरच आता मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
आव्हाडांवर झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यावरून साधा प्रचंड खळबळ माजली आहे. यावरून मुख्यमंत्री शिंदे यांना काही राजकीय मंडळीने टार्गेट केले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आव्हाड यांनी राजीनामा दिली की, नाही मला महित नाही, मात्र महिलेने जी तक्रार दाखल केली आहे. त्या गुन्ह्याची पोलीस नियमांनुसार चौकशी करतील. या प्रकरणी तपास करतील. पडताळणी करतील. जी काही तक्रार आहे, त्यात तथ्य असेल किंवा नसेल, त्याप्रमाणे पोलीस पुढील कार्यवाही करतील. आमचे सरकार कोणत्याही राजकीय सूड भावनेतून कोणतीही कारवाई करत नाही आणि करणार नाही, हे राज्य कायद्याचं आहे, आणि कायद्याने चालतं. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहे.