शरद पवार यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तब्येत उत्तम आहे...
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष हे मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थेमुळे रुग्णालयात दाखल आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमोनिया झाला होता. त्याच्या उपचारासाठी शरद पवार हे ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार घेत आहे. प्रकृतीची विचारणा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कॅडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतरत मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवार प्रकृतीची मी विचारपूस केली त्यांच्याशी मी बोललो त्यांची तब्येत चांगली आहे, निमोनिया देखील रिकव्हर झाला आहे. माझ्याशी खूप चांगलं बोलले त्यांची तब्येत उत्तम आहे. उद्या शरद पवार यांचे शिबिर आहे त्या शिबिर मध्ये जाऊन पुन्हा ते रुग्णालयामध्ये दाखल होणार असल्याचे म्हंटले आहे. शरद पवारांची तब्येत उत्तम असून त्यांची प्रकृती चांगली आहे त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी शुभेच्छा दिल्या असे ते यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. पवार यांना निमोनिया झाल्याची माहिती समोर आली होती. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या भेटीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे. ब्रीच कॅंडी रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्यानंतर शरद पवार आणि शिंदे यांच्यामध्ये जवळपास दहा मिनिटे चर्चा झाली आहे. उद्या शरद पवार यांचे शिबिर आहे त्या शिबिर मध्ये जाऊन पुन्हा ते रुग्णालयामध्ये दाखल होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.