कर्नाटक निवडणुकीतल्या भाजपच्या पराभवानंतर राऊतांची पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर सडकून टीका; म्हणाले, खुळखुळे...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल अद्यापही समोर येत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस चांगलीच वरचढ ठरल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपाचा या ठिकाणी दारूण पराभव झाला आहे. 224 जागांपैकी काँग्रेसने 134 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. या विजयाचा कर्नाटकासह महाराष्ट्रात देखील जल्लोष साजरा करण्यात येत आहे. यावर विविध प्रतिक्रिया येत असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली.
काय म्हणाले संजय राऊत?
कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर केली. त्यावेळी ते म्हणाले की, 'नरेंद्र मोदी, अमित शाह ही खेळणी, खुळखुळे आता निवडणूक जिंकण्यासाठी चालणार नाहीत. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या दहशतीला न जुमानता काँग्रेस पक्ष तिथे उभा राहिला. काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना निवडणुकीच्या तोंडावर ईडीची दहशत दाखवण्यात आली. शिवकुमार यांना तर तुरुंगात टाकण्यात आलं होतं. या सगळ्यांना न जुमानता कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे हुकूमशाहीचा पराभव केला आहे. त्यामुळे कर्नाटकची जनता कौतुकास पात्र आहे. असे ते यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, या निकालावर राज्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारलं असता फडणवीस यांचा राजकीय अभ्यास तोकडा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. “देवेंद्र फडणवीस यांचा गोंधळ मी समजू शकतो. ते ज्यांच्या संगतीला आहेत त्यांना राजकारण काही कळत नाही. ढेकणं संगे हिरा भंगला असं म्हणतात. तसा हा हिरा ढेकण्याच्या नादाला लागून भंगलाय. अशीही टीका त्यांनी केली.