अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
बोरिवलीत ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर हा विनोद घोसाळकर यांचा मुलगा असून गोळीबारात अभिषेक घोसाळकर जखमी झाले आहेत. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला आणि त्याने स्वतःला पण डोक्यात गोळी घालून संपवल्याची माहिती समोर येत आहे. अभिषेक घोसाळकर यांना दहीसरमधील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या गोळीबारानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आक्रमक झाले असून यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गोळीबार झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अभिषेक घोसाळकर आताच माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेले. आता बातमी आली त्याच्यावर गोळीबार झाला. काय चाललंय या राज्यात? गुंड्याचं सरकार बसलंय. एका आमदाराने गोळी घातली, ती पण पोलीस स्टेशनमध्ये. दोन्ही बाजूने गुंडागर्दी चालू आहे, हे सरकार उलथून लावावं लागेल. मिंधेला बदनाम करायची गरज नाही, ते बदनामच आहे, पण त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय.