Aaditya Thackeray : "राजीनामा द्या आणि निवडणूकीला या"

Aaditya Thackeray : "राजीनामा द्या आणि निवडणूकीला या"

आदित्य ठाकरेंचे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन
Published by :
Team Lokshahi
Published on

माजी पर्यटनमंत्री, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज (1 ऑगस्ट ) निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यानिमित्ताने सावंतवाडीत आज मोर्चेबांधणी पाहायला मिळाली. याचदरम्यान आमदारकीचा राजीनामा द्या, दुसरे म्हणजे परच येयाच असेल तर आमचे दरवाजे उघडे असतील,असे दोन पर्याय आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिले आहेत. सिंधुदुर्ग (Sindhudurg) यात्रेनिमित्त माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी माहिती दिली.

Aaditya Thackeray : "राजीनामा द्या आणि निवडणूकीला या"
शिवसेना संपतेय, काँग्रेससह मनसे, राष्ट्रवादीने.. ; जेपी नड्डांचा इशारा

दरम्यान दीपक केसरकर यांच्या होपपिचवर सावंतवाडीत आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे मोठ मोठे होल्डिंग शिवसेनेकडून लावण्यात आले. आदित्य ठाकरे जिल्ह्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर राज्यमंत्री, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात त्यांचा ताफा दाखल होणार आहे.

Aaditya Thackeray : "राजीनामा द्या आणि निवडणूकीला या"
राऊतांच्या घरातून साडेअकरा लाख रुपये जप्त; पाकिटावर एकनाथ शिंदेंचे नाव?

केसरकरांच्या सावंतवाडीत गांधी चौक येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला आदित्य ठाकरे संबोधित करणार असून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शिवसैनिकांनी देखील चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या सावंतवाडीतील स्वागताकडे सर्वांचं लक्ष लागलं असून शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांच्या होम ग्राउंडवर युवा नेते आदित्य ठाकरे काय बोलणार? हे पहावं लागणार आहे.

आज आदित्य ठाकरेंची तोफ केसरकरांच्या मतदारसंघात धडाडणार आहे. सिंधुदुर्गमध्ये आज शिवसेनेची निष्ठायात्रा असून आदित्य ठाकरेंच्या यात्रेनिमित्त शक्तीप्रदर्शन करण्यासाठी शिवसैनिकांनी चांगलीच कंबर कसली आहे. आज आदित्य शिवसैनिक आणि जनतेला संबोधित करतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com