मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांवर कारवाई होणार का? की दिल्लीश्वर...; आदित्य ठाकरेंचा मुलुंड घटनेवर संताप

मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांवर कारवाई होणार का? की दिल्लीश्वर...; आदित्य ठाकरेंचा मुलुंड घटनेवर संताप

मुंबईत मराठी माणसाला जागा देण्यास नकार दिल्याचा आरोप महिलेनी व्हिडिओतून केला असून तृप्ती देवरुखकर एकबोटे या महिलेचा हा व्हिडीओ आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

मुंबई : मुंबईत मराठी माणसाला जागा देण्यास नकार दिल्याचा आरोप महिलेनी व्हिडिओतून केला असून तृप्ती देवरुखकर एकबोटे या महिलेचा हा व्हिडीओ आहे. महाराष्ट्रीयन माणसाला इमारतीमध्ये घर देत नाही, असे सांगून घर भाड्याने देण्यास नकार दिल्याचा आणि जाब विचारल्यावर मारहाण केल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी केला. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांवर कारवाई होणार का? की दिल्लीश्वर...; आदित्य ठाकरेंचा मुलुंड घटनेवर संताप
बारामती अ‍ॅग्रोला मध्यरात्री नोटीस; 72 तासांत बंद करण्याच्या सूचना, रोहित पवार म्हणाले...

आदित्य ठाकरे म्हणाले कि, चीड आणणारी घटना. पण प्रश्न हा आहे, की हे पाहून मिंधे-भाजपा सरकार काय करणार? आमच्या मराठमोळ्या वारकऱ्यांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठ्या चालवल्या. तसा इथेही कायद्याचा धाक दाखवणार, की दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून ‘हाताची घडी तोडांवर बोट’ ठेवून गप्प बसणार, ह्या बिल्डींगवर कारवाई होणार का?

उद्या BMC आणि पोलीस पाठवणार का? की ‘थॅंक यू’ म्हणून बुलेट ट्रेनच्या कामाला वेग देणार? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. हिम्मत करा! कायद्याचा धाक ‘इथे’ दाखवा! महाराष्ट्र बघतोय! अतिशय संतप्त करणारी ही घटना, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.

काय आहे व्हिडीओत?

मुलुंड पश्चिमला शिवसदन इमारतीमध्ये ऑफिससाठी भाड्याने जागा पाहण्यास गेले असता घर मालकाने महाराष्ट्रीयन माणसाला घर देणार नाही, असे सांगत धक्काबुक्की केल्याचा आरोप तृप्ती यांनी केला आहे. तसा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर टाकला आहे. या व्हिडीओची आता महिला आयोगानेही दखल घेतली असून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com