जालना घटनेचा खरा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल

जालना घटनेचा खरा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या आमदार व खासदार यांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
Published on

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या आमदार व खासदार यांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. जालना घटनेचा खरा जनरल डायर कोण? असा निशाणा आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

जालना घटनेचा खरा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल
'लोकशाही'ने सौमय्यांचे खरं रुप समोर आणलं; विद्या चव्हाणांचा घणाघात

लाठीचार्ज झाल्यानंतर उद्धव ठाकरे तिथे पोहोचले. शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यायचा म्हणून लाठीचार्ज करण्यात आला. पोलीस अशा आंदोलनात लाठीचार्ज करत नाहीत. परिस्थिती बिघडू नये यासाठी आदेश घेतले जातात. ते सांगतात की आम्ही आदेश दिले नाहीत मग प्रशासन चालतं कसं, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

सरकार कसं चालतं हे राज्यपालांनी त्यांना शिकवावं. समिती नेमतील, एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करतील. लाज असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जालना घटनेचा खरा जनरल डायर कोण? असा निशाणाही आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण नवव्या दिवशी पण सुरुच आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. उपोषण स्थळीच त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडायचं नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com