राम मंदिराच्या सोहळ्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्नं...

राम मंदिराच्या सोहळ्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्नं...

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. या सोहळ्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिकिया दिली आहे.
Published on

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. हा सोहळा भारतच नाही तर जगभरातील भक्त पाहत होते. या सोहळ्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिकिया दिली आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे म्हटले आहे.

राम मंदिराच्या सोहळ्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्नं...
Ayodhya PM Modi : राम मंदिर विकसित भारताचा साक्षीदार असेल : पंतप्रधान

आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरुन आपल्या भावना मांडल्या आहेत. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम! हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पाहिलेलं स्वप्नं आज पूर्ण झालं, सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचं आणि बलिदानाचं सोनं झालं! प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय असो! जय सिया राम, असे आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे.

दरम्यान, राम मंदिराच्या उदघाटनावेळी पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. मला प्रभू रामाकडे क्षमा मागायची आहे. आपल्या त्याग आणि प्रयत्नांमध्ये अशी काही कमतरता होती की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. आज ती उणीव भरून निघाली आहे. माझा विश्वास आहे की. देव मला नक्कीच माफ करेल, असेही पंतप्रधानांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com