राज्याचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? आदित्य ठाकरेंची महत्वपूर्ण प्रतिक्रिया, म्हणाले...

राज्याचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? आदित्य ठाकरेंची महत्वपूर्ण प्रतिक्रिया, म्हणाले...

लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमात ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी दिलखुलास संवाद साधला.
Published on

मुंबई : लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमात ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी दिलखुलास संवाद साधला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारला असता त्यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? आदित्य ठाकरेंची महत्वपूर्ण प्रतिक्रिया, म्हणाले...
आदित्य ठाकरेंचे लोकशाहीच्या व्यासपीठावरुन मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; माझ्या बाजूला...

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

देशाला महाराष्ट्रात घटनेला पकडून मुख्यमंत्री पाहिजे. घटनाबाह्य मुख्यमंत्री नको. महाराष्ट्राशी प्रमाणिक राहणारा मुख्यमंत्री पाहिजे. ज्यांनी त्याला घडवलं त्यांच्याशी प्रमाणिक राहणारा मुख्यमंत्री पाहिजे. जो व्यक्ती ज्यांनी घडवल त्यांच्याशी प्रामाणिक राहू शकत नाही. तो इतरांशी काय प्रामाणिक काय राहणार? हा भाजपलाही तेवढाच धोका आहे. आमच्यासोबत जे केले ते वरच्या पदासाठी त्यांच्याशीही करु शकतात, असा इशारा आदित्य ठाकरेंनी भाजपला दिला आहे. मुख्यमंत्र्यांना काम करण्याची आवड पाहिजे. म्हणजे नुसते गरागरा फिरणे नाही. तर, चांगल्या भावनेने लोकांची मदत करणे. तर मुख्यमंत्री हे जे जनता व लोकशाही ठरवतील ते होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com