सीमावादावर घटनाबाह्य सरकार बोलत नाही; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका

सीमावादावर घटनाबाह्य सरकार बोलत नाही; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका

आदित्य ठाकरे नागपुरात दाखल झाले असून अधिवेशना आधीच शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले
Published on

नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. यादरम्यान शिंदे-फडणवीस सरकारला अनेक मुद्द्यांवरुन विरोधक घेरण्याची शक्यता आहे. तर, शिवसेना नेते आदित्य ठाकरे नागपुरात दाखल झाले असून अधिवेशना आधीच शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे. लवकरच कोसळेल, असे त्यांनी म्हंटले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक मुद्दे समोर येत आहेत. कर्नाटक सीमा वाद सुरू आहे. पण, घटनाबाह्य सरकार काही बोलत नाही. उद्योग महाराष्ट्र बाहेर गेलेत मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं माझ्यासोबत मीडियासोबत येऊन चर्चा करावी पण त्यावर बोलत नाही. मागील काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पण, त्यावर बोलत नाही, ओला दुष्काळ झाला. असे मुद्दे सभागृहात उचलू, असे त्यांनी सांगितले आहे. विदर्भाचे मुद्देही घेणार असल्याचे म्हंटले आहे.

नॅनोचा तरी प्रकल्प नागपुरात येऊ द्या. कर्नाटक निवडणूक असल्याने महाराष्ट्रातील जिल्हे तोडून कर्नाटकमध्ये न्यायचे आहे. गुजरात निवडणूक होती त्यावेळी उद्योग पळवून नेलेत. हे सरकार कोणाचेच काही ऐकत नाही तर केवळ गद्दार मंत्र्यांचे ऐकतात. आम्ही महाराष्ट्राचा जनतेचे ऐकून काम करु. हे घटनाबाह्य सरकार आहे. लवकरच कोसळेल, पण सरकार कोणाचेच ऐकत नाही, अशीही टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

दरम्यान, तीन वर्षांच्या खंडानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होतंय. पहिल्याच दिवशी सरकारच्या बाजूने अध्यादेश आणि पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळण्यावर भर असणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल. या अधिवेशनाला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेही हजेरी लावणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com