उध्दव ठाकरेंना एकटं पाडण्याचा गद्दारांचा कट; आदित्य ठाकरेंचा आरोप
मुंबई : बंडखोरांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत. शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) व ठाकरे कुटुंबाला एकटं पाडण्याचा गद्दारांचा प्रयत्न आहे, असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर शरसंधान साधले. ते आज कोल्हापूरमध्ये बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, सगळीकडून शिवसैनिकांचं प्रेम मिळतं आहे. लोकांना गद्दारी पसंत नाही. प्रत्येकजण म्हणतोय आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर आहे. सर्व शिवसैनिक उद्भव ठाकरेंसोबत आहेत. उध्दव ठाकरे व ठाकरे कुटुंबाला एकटं पाडण्याचा गद्दारांचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. परंतु, राज्यातील जनता आमच्या पाठीशी आहे. लोक आम्हाला एकटं पाडू देणार नाहीत. बंडखोरांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत. हे गद्दारांचं सरकार कोसळणारच, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
ठाकरे सरकारनं केलेली कामं रखडली. दिलेल्या निधीला स्थगिती मिळणे ही महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. या सरकारचा शपथविधी बेकायदेशीर आहे. पुढील अडीच वर्षांत ते सर्व खापर आमच्यावर फोडतील, असा टोला त्यांनी लगवला.
शिवसेनेला एकटे पडण्याचा कट हे गद्दार करत होते. आता कोणताही राजकीय पक्ष खुश नाही. 2 लोकांचे जम्बो कॅबिनेट आहे. इतके दिवस तिसरा माणूस मिळाला नाही त्यामुळं खरा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आहे, अशीही टीका त्यांनी शिंदे सरकारवर केली आहे.