महाराष्ट्र सरकार गुजरातमधून चालवायचं हेच शिंदे-भाजपाचं ध्येय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र सरकार गुजरातमधून चालवायचं हेच शिंदे-भाजपाचं ध्येय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबईतून हिरे व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आता सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
Published on

मुंबई : मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला इथला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतून हा व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आता सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे.

महाराष्ट्र सरकार गुजरातमधून चालवायचं हेच शिंदे-भाजपाचं ध्येय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
बीडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम बंद पाडला; कारण काय?

वेदांता फॉक्सकॉन, एयरबस टाटा, बल्क ड्रग्स पार्क, ४० गद्दार, क्रिकेट वर्ल्ड कप फायनल आणि आता डायमंड बोर्स विचार करा. महाराष्ट्राचं महत्व कमी करण्यासाठी काय काय खेचत आहेत गुजरातला आणि हे सगळं बुलेट ट्रेन सुरु होण्याआधी. ह्या मिंधे-भाजपाचं ध्येय आहे की महाराष्ट्र सरकार पण गुजरात मधूनच चालवायचं आणि मुंबई पण, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. ह्या महाराष्ट्र द्वेष्ट्या मिंधे-भाजपाला आपण साथ देणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, सूरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी डायमंड हब इमारत गुजरातमधील सूरत येथे बांधण्यात आली आहे. त्यामुळे आता हिरे व्यापारी मुंबईतून आपला हिरे व्यवसाय बंद करून सूरतला निघाले आहेत. सूरत डायमंड बोर्समध्ये हिरे व्यापाऱ्याला सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सूरतच्या हिरे कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेले हिरे जगभरात पाठवले जातात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com