राजकारण दूर ठेवा अन् मदत करा; आदित्य ठाकरेंचे शिंदे सरकारला आवाहन

राजकारण दूर ठेवा अन् मदत करा; आदित्य ठाकरेंचे शिंदे सरकारला आवाहन

परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आजपासून दौऱ्यावर असणार आहेत.
Published on

मुंबई : परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आजपासून नाशिक, पुणे दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत. तर, आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

राजकारण दूर ठेवा अन् मदत करा; आदित्य ठाकरेंचे शिंदे सरकारला आवाहन
बच्चू कडूंनी स्वाभिमान घाण ठेवला तरी...; सुषमा अंधारेंचा घणाघात

आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. मागील आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. आज आम्ही शेतकऱ्यांना धीर द्यायला जात आहोत. सरकार किती घटनाबाह्य असलं तरीही सरकारी यंत्रणेकडून मदत ही लगेच झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करणारे आमचे सरकार होतं. आता विरोधी पक्षात असलो तरी आमची जबाबदारी म्हणून आम्ही जात आहोत. शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर उभे राहणार आहोत. शेतकऱ्यांसोबत उभ राहणं हे गरजेचे आहे. या सरकारचे घोषणा यंत्र झाले आहे, कुठेही घोषणेची अंमलबजावणी दिसत नाही. दहीहंडी असो वा शिधा वाटपाबाबत घोषणा आणि तारखा फक्त पाहायला मिळतात. कृषिमंत्री आणि इतर मंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाऊन भेट देणे गरजेचे आहे. राजकारण दूर ठेवा आणि मदत करा, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले आहे.

राजकारण दूर ठेवा अन् मदत करा; आदित्य ठाकरेंचे शिंदे सरकारला आवाहन
भ्रम निर्माण करण्याचा भाजपकडून अश्लाघ्य प्रयत्न; अरविंद सावंतांची कडाडून टीका

दरम्यान, परतीच्या पावसाचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकात अद्यापही पाणी साचलं आहे. त्यामुळं हातची पिकं वाया गेली आहेत. या नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी दौरे सुरु केले आहेत. व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावरुन विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. याच पार्श्वभूमीवर या नुकसानीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी शिंदे-फडणवीसांनी एकत्रित दौरा आयोजित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com