...आता पुन्हा गुवाहाटी; आदित्य ठाकरेंनी उडवली शिंदे गटाची खिल्ली

...आता पुन्हा गुवाहाटी; आदित्य ठाकरेंनी उडवली शिंदे गटाची खिल्ली

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यावरुन आदित्य ठाकरेंनी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
Published on

मुंबई : अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांना 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समोर येत आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. तर, आदित्य ठाकरेंनी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

...आता पुन्हा गुवाहाटी; आदित्य ठाकरेंनी उडवली शिंदे गटाची खिल्ली
शरद पवारांनी सांगितली पुढची रणनिती; कारवाई होणार

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं?? रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो. जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी, असा खोचक सवालही त्यांनी विचारला.

एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “१४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला?? आणि सर्वात महत्वाचं आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने काय केलं?? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना! एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! 'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी', अशी ही लढाई असणार आहे, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधाला आहे. राज्यामध्ये आज अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदारांनी शिवसेना-भाजप युतीच्या डबल इंजिन सरकारला विकासासाठी साथ दिली आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. विकासाच्या राजकारणाला विकासाच्या माणसाने साथ दिली आहे. डबल इंजिन सरकारला ट्रिपल इंजिन जोडलं आहे. राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल, असे विश्वास त्यांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com