नेत्यांसाठी एक दुसऱ्यांमध्ये भिडणाऱ्या कार्यकत्यांनी 'हा' व्हिडिओ नक्की बघा
आज दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांचे मेळावे सायंकाळीच होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात होईल. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे- कुर्ला संकुलात होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर हजारो शिवसैनिक, नेते मुंबईत दाखल होत आहेत. औरंगाबादच्या विमानतळावरुन 70 शिवसैनिक सकाळच्या विमानाने मुंबईमध्ये दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. तर याचवेळी याच विमानातून शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुध्दा होते. या दोन्ही नेत्यांचा एकत्र प्रवासाचा व्हिडिओ समोर आला आहे. शिंदे गटाचे नेते तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंबईत होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी तब्बल 500 बस बुक केल्या आहेत. यामध्ये साडेतीनशे एसटी महामंडळाच्या बसेस असून,बाकी खाजगी बसेस बुक करण्यात आल्या आहे.
औरंगाबाद ते मुंबई या सकाळच्या विमानाने दानवे आणि भुमरे मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी दोन्ही नेत्यांच्या खुर्च्या आजूबाजूलाच होत्या.