कसब्याची लोकसंख्या विचारताच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले भडकले
चंद्रशेखर भांगे | पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले अभिजीत बिचुकले आज पत्रकारवरती चांगलेच भडकले. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न काय आहेत? किती लोकसंख्या असे विचारला असताच? बिचुकले यांनी अतिशय आक्रमक होत मला भारताची लोकसंख्या माहिती. कसब्याची नाही, असे म्हणून उत्तर दिले.
पत्रकाराने कसबा विधानसभा मतदारसंघातल्या विविध प्रश्न विचारले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते बाहेर आले. त्यानंतर पत्रकाराने जनतेचे प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत त्या भागातल्या? असा प्रश्न विचारला असता ज्याने 40 वर्ष त्या ठिकाणी सत्ता केली त्यांना विचारा. जनतेला माहिती तिथले प्रश्न मला माहित नाही, असं उत्तर अभिजीत बिचुकले यांनी दिले. त्यामुळे अभिजीत बिचुकले यांना कुठलीच माहिती नसताना त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. हे आज समोर आल्यामुळे अभिजीत बिचुकले पत्रकारावरच चिडले. आणि त्यांनी पत्रकारांशी बोलताना अतिशय आक्रमक भाषेत, संतापाने त्यांनी उत्तरे दिली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देता येत नसल्याने अभिजीत बिचुकले निघून गेले आहेत.
त्यापूर्वीच अभिजीत बिचुकले यांचा सचिन इंगळे यांच्याशी वाद झाला होता. त्यावेळी देखील त्यांनी अशी असंविधानिक भाषा त्या ठिकाणी वापरली. त्यावर सुद्धा बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले, मी जय भीम म्हणणार तुम्ही जय भीम आहेत का? असे तो म्हणाला आणि मी त्याला म्हणालो, कोणीही येईल आणि मला बोलेल मी तसं होऊ देणार नाही, असं म्हणत त्यावर सुद्धा अभिजीत बिचुकलेंनी संताप व्यक्त केला.
अभिजीत बिचुकले कसब्याचा अर्ज भरण्यासाठी आले खरे मात्र त्यासाठीचे प्रश्न त्यांना माहित नसल्याने त्यांची आज तारांबळ उडाली. पत्रकाराने तुम्हाला काय अभ्यास आहे, असे विचारले असता संविधानिक फंडामेंटल सांगा असं म्हणत ते पत्रकारांनाच प्रतिप्रश्न करू लागले. परंतु, कसबा विधानसभा मतदारसंघात ते उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्या ठिकाणचा एकही प्रश्न अभिजीत बिचुकलेंना सांगता आले नाही. नेहमी आपण संविधानिक लोकशाहीचा भाषा करत असताना खरंतर असे उमेदवार कसे काय निवडणूक लढू शकतात हाही खरा प्रश्न आहे. कारण ज्या उमेदवारांना तिथली लोकसंख्याच माहित नाही. मतदारसंघातल्या समस्याच माहित नाहीत .मतदार संघच माहित नाहीत. अशाने सुद्धा लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. हे खरंतर लोकशाहीचीच खंत आहे
केवळ माध्यमांमध्ये प्रसिद्धी आहे आणि मला प्रसिद्धी माध्यम प्रसिद्धी देतात यासाठी केवळ असा स्टंटबाज या भारतात सुरू आहे. आपण ज्या ठिकाणाहून उमेदवारी भरत आहोत. त्या ठिकाणची प्राथमिक माहिती त्या उमेदवारांना असणं गरजेचं असतं. परंतु, अभिजीत बिचुकलेंना एकही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे ते शेवटी माध्यमाच्या सर्वच प्रतिनिधीवर चिडून निघून गेले.