ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार असतील तर स्वागतच; शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार असतील तर स्वागतच; शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसत-गप्पा मारत विधानभवनात दाखल झाले होते.
Published on

शिर्डी : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसत-गप्पा मारत विधानभवनात दाखल झाले होते. यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. यामुळे शिंदे गटातही काही प्रमाणात अस्वस्थाता दिसून आली होती. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठे विधान केले होते. ठाकरे आणि फडणवीस पुन्हा एकत्र येणार असतील तर स्वागतच असल्याचे विधान सत्तारांनी केले आहे. शिर्डीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार असतील तर स्वागतच; शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान
राहुल गांधींची खासदारकी रद्द! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; लोकशाहीच्या मूल्यांना छेद

देवेंद्र फडणवीस जे काही करतात ते विचारपूर्वक करतात. त्यांची इच्छा असेल तर हे होऊ शकतं. दोघांनी अनेक वर्ष सोबत काम केलं आहे. त्यांच्यात कोणतीही कटूता नाही, असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. तसेच, राजकारण कधी काय होईल हे सांगता येत नाही. देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला तर तो सर्वांना मान्य राहील. ठाकरे आणि फडणवीस पुन्हा एकत्र येणार असतील तर स्वागतच, असे त्यांनी म्हंटले आहे.

तर, संजय राऊतांच्या भाजप दंगली घडवून निवडणूक लढवण्याच्या वक्तव्याचा समाचारही अब्दुल सत्तार यांनी घेतला आहे. जे दंगलखोर असतात ते दंगलीच्या गोष्टी करतात. भाजपचा दंगली घडवण्याचा प्रश्नच नाही. देशात सत्तेत असणारे कधीही दंगली घडवत नाहीत. फक्त भाजपला बदनाम करण्याचं काम संजय राऊत करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदार गुवाहाटीला गेल्याने शिवसेनेत उभी फूट पडली होती. अनेक घडामोडीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार विराजमान झाले होते. यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु होते. परंतु, अब्दुल सत्तारांच्या या विधानावरुन राजकीय वर्तुळात आता वेगळीच चर्चा रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com