राजकारण
ज्याला बायको नाही, त्याला पंतप्रधानपदाची संधी देऊ नये - लालू प्रसाद यादव
हेल्थ चेकअपसाठी लालू प्रसाद यादव पाटण्याहून दिल्लीला पोहोचले.
हेल्थ चेकअपसाठी लालू प्रसाद यादव पाटण्याहून दिल्लीला पोहोचले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 2024 मध्ये विरोधकांकडून पंतप्रधान पदासाठीचा चेहरा कोण? असा सवाल त्यांना विचारण्यात आला.
यावर लालू प्रसाद म्हणाले की, ज्याला बायको नाही, त्याला पंतप्रधान पदाची संधी देवू नये. पत्नीशिवाय पंतप्रधान निवासस्थानी राहणं चुकीचं आहे. हे आता थांबलं पाहिजे. तसेच 2024 च्या निवडणुकीत विरोधकांना 300 जागा मिळतील. असे लालू प्रसाद म्हणाले.