Youth Budget 2024: उच्च शिक्षणासाठी 'एवढ्या' लाख रुपयांचे मिळणार कर्ज; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट मांडण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर केला. अर्थमंत्री सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाही सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. रोजगार, शेती त्यासोबतच उद्योग या क्षेत्रांसाठीही घोषणा जाहीर केल्या आहेत. मोदी सरकारच्या 3.0 पहिल्या पूर्ण बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली. देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची मोठी घोषणा त्यांनी केली.
मात्र, या अर्थसंकल्पेत महिला, शेतकरी, विद्यार्थी, तरुण, रोजगार यांच्यासाठी मत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तर या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना 10 लाख रूपयांचे उच्च शैक्षणिक कर्ज देणार असल्याची घोषणा अर्थमंत्रा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली.
ही मदत विशेषतः अशा विद्यार्थ्यांना दिली जाईल जे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. यासाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ई- व्हाऊचर दिले जाणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. शिक्षण, रोजगार आणि प्रशिक्षणासाठी 1.54 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, 500 प्रमुख कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. यासाठी 5 हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन आणि 6 हजार रुपये एक रकमी पैसे मिळणार आहेत. शैक्षणिक कर्जामध्ये 3 टक्के सवलत दिली जाणार आहे.