शिवसेना आमदार नितीन देशमुखांवर नागपुरात गुन्हा दाखल

शिवसेना आमदार नितीन देशमुखांवर नागपुरात गुन्हा दाखल

नितीन देशमुख यांच्यावर नागपुरात सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय
Published on

कल्पना नळस्कर | नागपूर : शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार नितीन देशमुख यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीएसआय सखाराम एकनाथ कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वेगवेगळ्या कलमानुसार नागपुरातील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शिवसेना आमदार नितीन देशमुखांवर नागपुरात गुन्हा दाखल
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शिंदे सरकारकडून समिती स्थापन

नागपूर शहरामध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने कांबळे हे रवि भवन मुख्य प्रवेशद्वार येथे ड्यूटी लागली होती. कांबळे सकाळी रवि भवन येथे येणाऱ्या वाहनांचे पासेस चेक करुन तसेच येणाऱ्या व्यक्तींचे तेथेच बाजुला लागलेल्या पेन्डॉलमध्ये पासेस तयार झाल्यानंतर ते पासेस चेक करुन त्या व्यक्तींना आत प्रवेश देत होते.

यावेळी आमदार देशमुख यांनी हाताने धक्का देवून जबरदस्तीने त्यांच्यासोबत असलेल्या काही लोकांना विनापासचे रवि भवनच्या आतमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नितीन देशमुख व त्यांच्या सोबतचे साथीदारांविरुध्द कार्यवाही करण्यात यावी, अशी तक्रार कांबळे यांनी सदर पोलिस ठाण्यात दिली आहे. यानंतर आमदार नितीन देशमुखांसह अन्य लोकांवर विविध कलमांनुसार नागपुरातील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com