कोविड घोटाळ्याबाबत मोठी बातमी; किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल
कोविड घोटाळ्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बॅाडी बॅग खरेदी प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. १५०० रूपयांची बॅाडी बॅग ६७०० रूपयांना खरेदी केल्याचे प्रकरण आहे. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांचा हात असल्याचा आरोप माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केला होता.
मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2000 रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने (ED) म्हटलं आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. ईडीने 21 जून रोजी राज्यभर छापे मारले होते. या छाप्यात 68 लाख 65 हजार रुपये रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. मुंबई महापालिकेने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचं अंमलबजावणी संचलनालय (ED) म्हणणं आहे.