Rajan Salvi: एसीबीच्या चौकशीनंतर राजन साळवींच्या विरोधात गुन्हा दाखल

Rajan Salvi: एसीबीच्या चौकशीनंतर राजन साळवींच्या विरोधात गुन्हा दाखल

शिवसेनेचे आमदार राजन साळवी याच्या घरी (ACB) धाड पडली आहे. या एसीबीच्या धाडीत डी वाय एस पी सुशांत चव्हाण याच्या पथका सह 20 अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या घरी (ACB) धाड पडली आहे. या एसीबीच्या धाडीत डी वाय एस पी सुशांत चव्हाण यांच्या पथका सह 20 अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत. आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीची टीम ही सकाळीच दाखल झालेले असून यात 19 ते 20 अधिकारी, कर्मचारी यात समावेश असून या एसीबीच्या पथकाकडून राजन साळवी यांच्या घरांची झाडझडती घेतली जात आहे.

आज राजन साळवी रत्नागिरीच्या घरी असल्यामुळे ते घरीच होते. रत्नागिरीच्या या टीम मध्ये डी वाय एस पी सुशांत चव्हाण यांच्या सह कर्मचारी व रायगड टीम कडून ही झाडझडती सुरु झाली आहे. आत्तापर्यंत राजन साळवी यांची सहा वेळा चौकशी झाली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com