आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदे गटाचे सहा हजार पानी लेखी उत्तर; काय आहेत मुद्दे?
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. याविरोधात उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली. या पार्श्वभूमीवर आता आमदार अपात्रतेप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांनी सहा हजार पानांचे लेखी उत्तर सादर केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हे सविस्तर उत्तर सादर करण्यात आलं आहे. यामध्ये कोणते मुद्दे आहेत ते आता समोर आले आहे.
6 हजार पानांच्या उत्तरात शिवसेना आमदारांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे
1) शिवसेना आमदारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांमुळे होणारी कुचंबना.
2) मुख्यमंत्री पक्षाचा असूनही आमदारांच्या भेटी होत नसल्यामुळे नाराजी.
3) मतदार संघातील कामे आपले सरकार असूनही मार्गी लागत नसल्याची खंत, विकास निधी मिळत नव्हता.
4) राष्ट्रवादीचे मंत्री विशेषता अजित दादांकडून शिवसेना आमदारांच्या संघात होणारी घुसखोरी.
5) शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलं जाणारं बळ.
6) पक्षाने एकाएकी बदललेल्या भूमिकेमुळे मतदार संघात उत्तरे देताना आमदार नाकीनऊ.
7) बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोडून सुरू असलेले तडजोडीचं सत्ताकारण.
8) निवडक लोकांचे ऐकून घेतले जाणारे निर्णय, पक्षातील नेत्यांकडून मिळणारी सापत्नं वागणूक.
9) अडचणीच्या काळात पक्षाचे नेते मागे उभे न राहत असल्याची खंत.
10) आम्ही पक्ष फोडला नसून बाळासाहेबांचे विचार घेऊन पक्ष वाढवत असल्याची भूमिका.
11) जनतेने दिलेला कौल व त्या विरोधात पक्ष प्रमुखांनी घेतलेली भूमिका.
12) शिवसेनेने आपली विचारसरणी सोडून स्वतःच घटनेची पायमल्ली कशी केली याचा दाखला काही आमदारांनी उत्तरात दिलाय.
13) तसेच शिवसेनेत फूट पडण्याआधी घडलेल्या घडामोडी कायद्याला धरुन कशा होत्या याचे दाखले दिले गेलेत.
14) २०१४, २०१९ निवडणूकांकरता झालेल्या बैठका त्यातील तपशील देखील देण्यात आलाय.
15) तत्कालीन पक्ष प्रमुखांनी घेतलेली भूमिका आणि नंतरची भूमिका याबाबत काही कागदपत्रांसह आमदारांनी उत्तर दिलयं.
16) विशेष करुन पक्षात फूट पडत आहे याबाबत आमदारांनी तत्कालीन वरिष्ठांनी लिहिलेले पत्र.