राजकारण
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात 24 तासांत 12 रुग्णांचा मृत्यू
नांदेडमध्ये 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
नांदेडमध्ये 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर बाब म्हणजे यात नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेवरुन आरोग्य यंत्रणेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यातच आता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मागच्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 12 मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार घाटी रुग्णालयात 15 दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा असल्याची माहिती आहे.