चंद्रकांत पाटलांवर शाईफेक हल्ल्याप्रकरणी 11 पोलीस तडकाफडकी निलंबित
चंद्रशेखर भांगे | पिंपरी : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी 11 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शाईफेक घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांवर कोणतीही कारवाई करु नये, अशी विनंती केली होती. तरीही 11 पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी शाईफेक घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी पोलिसांचा कोणताही दोष नसून त्यांच्यावर निलंबनांची कारवाई करु नये, अशी विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केली होती. परंतु, घटनेच्या दुसऱ्याच दिवशी 11 पोलिसांचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तडकाफडकी निलंबन केले आहे. यात १ पोलिस निरीक्षक, २ दोन उपनिरीक्षक आणि ७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला होत असताना सीसीटीव्हीत सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशांत अमृतकर हे घटनास्थळावर असताना त्यांच्यावर कारवाई न करता पोलिस शिपाई आणि तिघा आधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनतर आज देखील या विधानाचे पडसाद आज सर्वत्र दिसून आले आहे. दरम्यान, पुणे दौऱ्यावर असताना पिंपरी- चिंचवड येथे भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.