'आप'चे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक; 10 तासांच्या चौकशीनंतर कारवाई

'आप'चे खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक; 10 तासांच्या चौकशीनंतर कारवाई

दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी आप राज्यसभा खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली आहे.
Published on

नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी आप राज्यसभा खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक केली आहे. याआधी त्यांची दीर्घकालीन चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, याचप्रकरणी आधी मनीष सिसोदीया यांना अटक केली आहे.

ईडी मद्य धोरण घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. या प्रकरणी ईडीने जानेवारीमध्ये आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव समाविष्ट केले होते. यानंतर आज सकाळी सात वाजल्यापासून संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर ईडीने छापा टाकला होता. येथून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. अबकारी धोरण प्रकरणाच्या आरोपपत्रातही संजय सिंह यांचे नाव आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com