लोकसभेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; प्रेक्षक गॅलरीतून 3जण संसदेत शिरले

लोकसभेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; प्रेक्षक गॅलरीतून 3जण संसदेत शिरले

लोकसभेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; प्रेक्षक गॅलरीतून 3जण संसदेत शिरले
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

Parliament Winter Session 2023 : लोकसभेतील हल्ल्याला आज 22 वर्ष पूर्ण होत असतानाच आता पुन्हा एकदा लोकसभेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रेक्षक गॅलरीतून 3 अज्ञातांनी संसदेच्या कामकाजावेळी सभागृहात उडी मारली. तसेच त्यांनी लक्ष वेधण्यासाठी स्मोक कँडल जाळल्या. याच पार्श्वभूमीवर आता लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

संसदेत पकडलेल्या दोघांपैकी एकजण लातूरमधील असल्याची माहिती मिळत आहे. अमोल शिंदे असे या त्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच त्या महिलेचे नाव निलम सिंह असून ती हरियाणातील असल्याची माहिती मिळत आहे. नेहमीप्रमाणे गॅलरीत प्रेक्षकांची गर्दी होती. या गर्दीत तीन जण होते, त्यातील दोघांनी गॅलरीतून खाली उडी मारली. गोंधळ घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एक पुरुष आणि एका महिलेचा यात समावेश आहे.

22 वर्षापूर्वी म्हणजे 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. त्या दिवशीही संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होते.

नेमकं संसदेत काय घडलं?

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होते. याच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यापैकी एकाने गॅलरीतून खाली उडी मारली. त्याच्याकडे स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेतील या प्रकारामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अचानक धूर सुरु झाला. या दोघांना आता पकडण्यात आलं आहे. यापैकी एकाचं नाव सागर असल्याचं समजतं. पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यात एकजण अमोल शिंदे हा महाराष्ट्र लातूरचा असल्याचे समजते तर नीलम कौर सिंह ही हरियाणातील असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com