LIVE | Maharashtra Gram Panchayat Elections 2021 | ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा!
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यात वर्षभरापूर्वी आकारास आलेली सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी पक्ष भाजपमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जोरदार चुरस आहे.
परभणी : परभणी जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडतंय. पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात एकूण 75 हजार 695 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी 11.27 इतकी आहे. आज सकाळी 7.30 ते 9.30 या वेळात परभणी तालुक्यात 12 हजार 366 मतदारांनी मतदान केले, याची टक्केवारी 11.46 इतकी आहे. सेलू तालुका 8548 (13.11%), जिंतूर 10 हजार 463 (9.56%), पाथरी 8114 (14.54), मानवत 6604 (12.47), सोनपेठ 5296 (11.20), गंगाखेड 8900 (9.95), पालम 6055 (10.00), पूर्णा 9349 (11.23%) मतदान झाले आहे.
अहमदनगर : नगर तालुक्यातील डोंगरगण येथील ग्रांमस्थाचा मतदानावर बहिष्कार टाकला आहे. एम आय डि सी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी यशवंत भुतकर या मुख्याध्यापकास मारहाण केली. मारहाणीच्या निषेधार्थ बहिष्कार टाकला. जो पर्यत माफी मागत नाही तो पर्यत मतदान करणार नसल्याची ग्रांमस्थाची भुमिका मांडली.
वर्धा : कारंजा तालुक्यातील जउरवाडा – खैरी गट ग्रामपंचायतमध्ये असलेल्या खैरी या पुनर्वसित गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. केवळ मतदानावर बहिष्कार टाकून हे मतदार थांबले नाहीत तर समस्या जगापुढे याव्या यासाठी चूल बंद आणि अन्न त्याग आंदोलन देखील करण्यात आलेय. गाव पुनर्वसित झाले तेव्हापासूनच गावातील सुविधांकडे सतत दुर्लक्ष होत आले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
वाशिम : जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतपैकी 11 ग्रामपंचायत अविरोध झाल्या असून 152 ग्रामपंचायतीसाठी 3226 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून जिल्ह्यातील शिरपूर,अनसिंग, काटा, जऊळका मांगुळ झनक अशा एकूण 152 ग्रामपंचायतीसाठी जिल्ह्यात आज मतदान केंद्रावर मतदानाला सुरवात झाली असून. जऊळका येथील मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी व्हीलचेअर,नसल्याने दिव्यांगाना तत्कळत बसावं लागलं.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून शांततेत सुरुवात झाली आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत 35.28 टक्के मतदान झाले असून मतदारांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 66 ग्रामपंचायतींमध्ये 494 जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होत आहे. या करता 1087 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.
आज होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांच्या प्रसिद्ध राळेगणसिद्धीत सुरेश दगडू पठारे व किसन मारुती पठारे हे मतदारांना साड्या वाटत असताना गुरुवारी सायंकाळी भरारी पथकाने रंगेहात पकडले दोघांना तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासमोर हजर करण्यात आले देवरे आणि शहानिशा केल्यानंतर पठारे विरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Maharashtra Gram Panchayat Elections 2021 LIVE Updates
- नांदगांव तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान
- सकाळी ७ : ३० ते ११: : ३० पर्यंत २७.६६ टक्के झाले मतदान
- एकूण २४८३६ मतदारांनी केले मतदान
- २४८३६ पुरुषांनी तर ११०९० स्त्री मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
- मालेगाव तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान
- सकाळी ७ : ३० ते ११: : ३० पर्यंत २८.८३ टक्के झाले मतदान
- एकूण ६०२५४ मतदारांनी केले मतदान
- ३४१२६ पुरुषांनी तर २६१२८ स्त्री मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
पंढरपूर ग्रामपंचायत मतदान टक्केवारी
- वेळ 7.30 ते 11.30
- एकुण झालेले मतदार
- पुरुष – 36579
- स्त्री – 31060
- एकुण – 67639
- टक्केवारी – 34.46
जळगाव मुक्ताईनगर फ्लॅश
मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथील मतदान केंद्रात एका ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला. तर प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ मशीन बदलले गेले.