Lokshahi Update
Lokshahi UpdateTeam Lokshahi

Live Update : TET घोटाळा प्रकरण, शिक्षण आयुक्त तुकाराम सुपे यांना जामीन मंजूर

महाराष्ट्रातील घडामोडींचे लाईव्ह अपडेटस्

या भूमीत अहिल्याबाईंचं कर्तृत्व रुजलं आहे. चौंडी, अकोला हा कायम दुष्काळी भाग राहिला.- चौंडीतून शरद पवार

अहमदनगर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना चौंडीत येण्यापासून पोलिसांनी अडविले. पडळकर आता राष्ट्रवादीचा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी तीन वाजता रॅलीसह चौंडीत येणार 

अनुसूचित महिलासाठी लॉटरी सोडत द्वारे 139 हा प्रभाग जाहीर अनुसूचित महिलासाठी लॉटरी सोडत द्वारे 190 हा प्रभाग जाहीर

मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत सुरू

निष्ठावंत उमेदवरांना शिवसेनेने उमेदवारी दिली – संजय राऊत

पुढील 25 वर्ष उद्धव ठाकरेचं मुख्यमंत्री असतील... शिवसेना नेते संजय राऊत यांचं मोठं विधान.

राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस पूर्व मोसमी पावसाची शक्यता... 3 ते 4 दिवस पावसासाठी पोषक वातावरण, हवामान विभागानं वर्तवला अंदाज...

हनुमान जन्मस्थळाचा वाद चिघळण्याची शक्यता... वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये आज शास्त्रार्थ सभा, देशभरातील विविध धर्मपिठाचे 25 ते 30 प्रतिनिधी सभेत सहभागी होणार...

देशभरातील इंधन दराच्या मुद्यावरून पेट्रोल पंप चालक-मालक आक्रमक... पेट्रोल पंप चालकांचा इंधन खरेदी न करण्याचा निर्णय, ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन केंद्र सरकारचा नोंदवणार निषेध

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कस्टडीवर आज निर्णय... सीबीआयनं मागितली भोसलेंची 10 दिवसांसाठी कस्टडी...

6 वर्षांपूर्वी केलेल्या नोटाबंदीचा निर्णय क्रांतिकारी नव्हता तर धक्कादायक होता... बनावट नोटांच्या सुळसुळाटावरून सामनातून मोदी सरकारवर ताशेरे...

राज ठाकरे आज लिलावती रुग्णालयात दाखल होणार... पायाचं दुखणं बळावल्यानं राज ठाकरेंवर 1 जूनला होणार शस्त्रक्रिया...

मुंबईसह 14 महापालिकांमध्ये आज प्रभाग आरक्षणाची सोडत...तर मुंबई महापालिकेच्या 236 प्रभागांसाठी आरक्षण...ओबीसी आरक्षणाचे 61 प्रभाग हे खुले प्रभाग होणार...आरक्षणाकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष

मुंबईत करोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात २३१ टक्क्यांनी वाढले. सोमवारपर्यंत मुंबईत २१५ जण रुग्णालयात, एप्रिलमध्ये ६५ तर मार्चमध्ये १४९ जण रुग्णालयात दाखल झाले होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेची शिवसेनेकडून आजपासून पूर्वतयारी.. शिवसेनेच्या सर्व संघटना, पुढारी आणि कार्यकर्त्यांच्या होणार बैठका... 8 जून रोजी उद्धव ठाकरेंची औरंगाबादेत भव्य सभा.. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com