शिर्डी साईदर्शनावर घातली मर्यादा
शिर्डीतील वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे संस्थानाने आता भाविकांची दर्शन मर्यादा घटवली आहे. तसेच दोन्ही आरतींना सुद्धा भाविकांना नो एंट्री असणार आहे. त्यामुळे साई भक्तांना मोठा धक्का बसला आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे साई संस्थानने भक्तांवर काही निर्बंध घातली आहेत. पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना नो एंट्री असणार आहे. दर गुरूवारची साईपालखी देखील बंद करण्यात आली आहे. सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंतच साईदर्शन घेता येणार आहे. त्याचबरोबर आता दिवसभरात केवळ 15 हजार भाविकांना साईदर्शन घेता येणार आहे. तसेच दर्शन रांगेतील भक्तांपैकी 150 ते 200 भक्तांची होणार दररोज कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.
शिर्डीतील ऑफलाईन पास काऊंटर गुरूवार, शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी बंद असणार आहे. तर रविवार,शनिवार, गुरूवार आणि सुट्टयांमध्ये ऑनलाईन पास घेणं बंधनकारक आहे. दरम्यान ज्या भाविकांना ऑनलाईन पास हवा आहे त्यांना www.sai.org.in या वेबसाइट वरून घेण्याचे आवाहन संस्थानने केले आहे.