एक लाख दंड आणि पंचांची थुंकी चाटा; दुसरे लग्न केलेल्या महिलेला जात पंचायतीची शिक्षा

एक लाख दंड आणि पंचांची थुंकी चाटा; दुसरे लग्न केलेल्या महिलेला जात पंचायतीची शिक्षा

Published by :
Published on

मंगेश जोशी | अकोला जिल्ह्यात घटस्फोत घेऊन दुसरे लग्न केल्याने जात पंचायतीने महिलेला पंचांची थुंकी चाटायचे व चप्पल डोक्यावर घेवून चालायचा अशी अमानुष शिक्षा सुनावल्याची घटना घडली आहे. तसेच महिलेकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल करत तिला समाजातून बहिष्कृत केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. तसेच अनिसच्या मदतीने आता जातपंचायती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील माहेर असलेल्या एका महिलेने पहिल्या पतीला घटस्फोट देऊन दुसरा विवाह केला होता. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या वडगाव येथील नाथ जोगी जातपंचायतीच्या पंचांनी तिला अमानुष शिक्षा केली.

जात पंचांनी सदर महिलेने पीडित महिलेला चक्क केळीच्या पानावर थुंकून ते चाटायचे व चप्पल डोक्यावर घेऊन चालायचा अशी अमानुष शिक्षा केली. तसेच पीडित महिलेकडून एक लाख रुपयांचा दंड देखील वसूल करत समाजातून बहिष्कृत केल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे.

दरम्यान आता जळगाव येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने अकोला जिल्ह्यातील वडगाव नाथजोगी जातपंचायती विरोधात सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.

नीलम गोऱ्हेंची गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अकोल्यातील घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com