शिवसेनेचा भाजपला धक्का; दिवंगत खा. मोहन डेलकर यांच्या पत्नीचा शिवसेनेत प्रवेश
दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार मोहन भाई डेलकर यांच्या पत्नी कला बेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पाडला.
दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार मोहन भाई डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. यावेळी कला बेन डेलकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उमेदवारी कला बेन डेलकर यांना देण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या या रणनितीमुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
शिवबंधन हे रक्षा कवच आहे हे आम्ही येत्या दिवसात मिळून जनतेसाठी काम करू… मी इतर पक्ष बद्दल काही बोलणार नाही…माझा मुलगा माझ्या सोबत आहे… आणि आम्हाला विश्वास आहे की शिवसेनाच चांगले काम करेल, अशी प्रतिक्रिया कला बेन डेलकर यांनी दिली.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील सी ग्रीन हॉलेटमध्ये पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले होते. दरम्यान त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या का केली याबाबतही मोठी चर्चा सुरू होती.या काळात शिवसेनेने डेलकर यांच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शवला होता.