गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर…अफवांवर विश्वास नको

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर…अफवांवर विश्वास नको

Published by :
Published on

सुप्रसिद्ध गायिका, गानकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आणखीन काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु ठेवावे लागणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी त्यांना रुग्णालयात ( Breach Candy Hospital ) दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोना सोबतच निमोनियाची लक्षणे दिसून आली. वयोमान आणि इतर शारीरिक व्याधींमुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, आणखीन काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु ठेवावे लागणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका

भारतरत्न लतादीदींच्या आरोग्याबाबत अनेक अफवा पसरत आहेत. मात्र अशा अफवा कुणीही पसरवू नयेत. लता दीदींवर अतिदक्षता विभागात डॉ. प्रतीत समदानी आणि त्यांच्या टीममधील डॉक्टर्स उपचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळावा, यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com