महाराष्ट्र
लासलगाव बाजार समितीत लेव्हीचा मुद्दा तापला; मजुरीची रक्कम मिळत नसल्याने कामगार आक्रमक
लासलगाव बाजार समितीत लेव्हीचा मुद्दा तापला असल्याचे पाहायला मिळत आहे.
विशाल मोरे, मालेगाव
लासलगाव बाजार समितीत लेव्हीचा मुद्दा तापला असल्याचे पाहायला मिळत आहे. माथाडी कामगार व मापारी यांचा लासलगाव बाजार समितीत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
व्यापारी व कामगारांमध्ये लेव्ही तसेच मजुरीच्या प्रश्नावरून वाद सुरू झाला आहे. मनमाड पाठोपाठ लासलगाव बाजार समितीतही माथाडी कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
कामगार व मापारी कामावर हजर असताना देखील त्यांना मजुरीची रक्कम मिळत नसल्याने माथाडी कामगारांचे लासलगाव बाजार समिती प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. मजुरीची रक्कम मिळत नसल्याने कामगार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.