परशुराम घाटात पाणी वळवल्यामुळे पेढे कुंभरवाडीत कोसळली दरड, गावकऱ्यांचा आरोप

परशुराम घाटात पाणी वळवल्यामुळे पेढे कुंभरवाडीत कोसळली दरड, गावकऱ्यांचा आरोप

Published by :
Published on

22 जुलै रोजी अति मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातून दरड कोसळली. पाण्याचा प्रवाहासह कुंभारवाडीच्या 6 घरांवर ही दरड कोसळली आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. दोन वर्षाचे बाळ आरुष मांडवकर त्याची आई आरोही मांडवकर आणि त्याची आजी सावित्री मंडवकर यांचा करुण अंत झाला.

तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मात्र यामध्ये दोन वर्षाच्या आरुषीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्याचे शोधकार्य सुरू आहे. परशुराम घाटामध्ये महामार्ग विस्तारीकरणाचे काम करत असताना तीन मोठे पाण्याचे प्रवाह एकत्रित कुंभारवाडीच्या वरच्या दिशेने जोडल्यामुळे ही दरड कोसळल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

याविषयी गेली दोन वर्ष ग्रामस्थ महामार्ग ठेकेदार, आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रार करत होते. मात्र त्यांची विनंती कुणीही न ऐकल्याने तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com