संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी | खेड-पोसरे दुर्घटनेतील १७ जणांचे मृतदेह हाती

Published by :
Published on

खेड तालुक्यातील पोसरे येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गाडल्या गेलेल्या 17 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. येथील सात घरं दरडच्या खाली गाडली गेली होती. अद्याप शोधकार्य सुरू आहे. यामध्ये सात जण जखमी अवस्थेत सापडले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळाल्या माहितीनुसार खेड पोसरे येथे 23 जुलै रोजी दरड कोसळली होती. या दुर्घटनेत सात घर दरडीखाली गाडली गेली होती. झालेल्या या दरड दुर्घटनेत 17 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. दुर्घटनेतील मृतांमध्ये पुढील लोकांनाच समावेश आहे. त्यात श्रीमती रंजना रघुनाथ जाधव (वय -50), रघुनाथ जाधव (वय -55), विकास विष्णु मोहिते (वय 35), श्रीम संगिता विष्णु मोहिते ( वय -69), सुनिल धोंडीराम मोहिते (वय -47 ), सुनिता धोंडीराम मोहिते (वय -42), आदेश सुनिल मोहिते (वय -25), श्रीम.काजेल सुनिल मोहिते (वय -19 ), श्रीम सुप्रिया सुदेश मोहिते (वय -26), कु विहान सुदेश मोहिते (वय 5), धोडीराम देवू मोहिते (वयं 71), श्रीम सविता धोडीराम मोहिते (वय -69), वसंत धोडीराम मोहिते( वय -44), श्रीम वैशाली वंसत मोहिते (वय -40), कु. प्रिती वसंत मोहिते (वय १), सचिन अनिल मोहिते (वय 29), श्रीम सुमित्रा धोडू म्हापदी (वय 69) यांचे मृतदेह सापडले आहेत.

या दुर्घटनेत जखमी झालेल्यामध्ये अनिल रघुनाथ मोहिते वय -49 श्रीम वसंती रघुनाथ मोहिते वय -68 श्रीम प्रिती सचिन मोहिते वय -27 श्री.सुरेश अनिल मोहिते वय -27 श्रीम सनीअनिल मोहिते वय -25 श्रीम सुजेल वसंत मोहिते वय -18 कु विराज सचिन मोहिते वय -4 यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com