महाराष्ट्र
Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणी आता येरवडा कारागृह प्रशासन रडारवर
ललित पाटील प्रकरणी आता येरवडा कारागृह प्रशासन रडारवर आले आहे.
अमोल धर्माधिकारी, पुणे
ललित पाटील प्रकरणी आता येरवडा कारागृह प्रशासन रडारवर आले आहे. कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
सुधाकर इंगळे मार्फत डॉ. संजय मरसळे यांना पैसे मिळाले होते. सुधाकर इंगळे आणि डॉ संजय मरसळे या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मरसळे हा ललित पळून जाण्याच्या २ दिवस आधी त्याच्याशी संपर्कात होता.
डॉ. संजय मरसळे यांनीच पैसे घेऊन ललितला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी "रेफर" केलं. डॉ संजय मरसळे यांच्या मोबाईलमध्ये अभिषेक बलकवडेचे कॉल सापडले. बलकवडे हा ललित पाटीलचा ड्रग्स कंपनी सांभाळणारा साथीदार होता.