Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस, थेट जमा होतील 5500...

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस, थेट जमा होतील 5500...

राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे.
Published by :
shweta walge
Published on

राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. दिवाळीला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.

महायुती सरकारने ऑक्टोबर महिन्यामध्ये पात्र मुलींना आणि महिलांना अतिरिक्त बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवाळी असून त्याआधी सरकारकडून सर्व लाभार्थी तरूणी आणि महिलांना ३००० रूपयांचा बोनस मिळणार आहे. ही रक्कम महिन्याला मिळणाऱ्या १५०० रूपयांपेक्षा वेगळी दिली जाणार आहे. त्यासोबतच काही महिलांना २५०० रूपये अतिरिक्त दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. यामध्ये लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रूपये त्यांच्या खात्यावर जमा होतात. या योजनेला पात्र होण्यसाठी काही अटी आहेत तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ ते ६० अशी वयोमर्यादा आहे. आता नवीन बदलानुसार हो वयोमर्यादा ६५ पर्यंत करण्यात आलीये. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखांच्या आतमध्ये आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिला यासाठी पात्र आहेत. मात्र अर्जदार महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असायला हव्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com