Mumbai Building Collapse | कुर्ला इमारत दुर्घटना, एकनाथ शिंदेंकडून पाच लाखांची मदत जाहीर

Mumbai Building Collapse | कुर्ला इमारत दुर्घटना, एकनाथ शिंदेंकडून पाच लाखांची मदत जाहीर

मुंबईतील कुर्ला पूर्व, शिवसृष्टी रोड वरील एका खासगी इमारतीचा काही भाग मध्यरात्री ( Mumbai Building Collapsed ) कोसळला. अग्निशमन दलाने १२ जणांना बाहेर काढले असून, 20 ते 25 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जाते.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

मुंबईतील कुर्ला पूर्व, शिवसृष्टी रोड वरील एका खासगी इमारतीचा काही भाग मध्यरात्री ( Mumbai Building Collapsed ) कोसळला. अग्निशमन दलाने १२ जणांना बाहेर काढले असून, 20 ते 25 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्याचे नगरविकास मंत्री आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) या दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. तसंच बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांनी ही मदत जाहीर केली आहे.

Mumbai Building Collapse | कुर्ला इमारत दुर्घटना, एकनाथ शिंदेंकडून पाच लाखांची मदत जाहीर
Sanjay Raut | "फडणवीसांनी या डबक्यात उतरु नये, त्यांची अप्रतिष्ठा होईल"

कुर्ला इमारत दुर्घटना प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून मंगेश कुडाळकर ( Mangesh Kudalkar ) यांनी मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपयांची मदत तर जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली. मंगेश कुडाळकर हे सध्या बंडखोरांच्या गटात गुवाहाटीला आहे.

Mumbai Building Collapse | कुर्ला इमारत दुर्घटना, एकनाथ शिंदेंकडून पाच लाखांची मदत जाहीर
Maharashtra Political Crisis LIVE | मी शिवसेनेतच, फक्त घटकपक्षांना सोडावे- उदय सामंत

१२ जण सुखरूप : कुर्ला पूर्व, नाईक नगर सोसायटी, शिवसृष्टी रोड येथील कलेक्टर यांच्या जागेवरील एका खासगी इमारतीचा काही भाग रात्री 11.50 च्या सुमारास कोसळला. या इमारतीचा भाग दुसऱ्या इमारतीवर पडला आहे. इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्या खाली 25 ते 25 लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 फायर इंजिन तसेच 2 रेस्क्यू वाहने घटनास्थळी दाखल झाले असून, १२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com