Kirit somaiya
Kirit somaiya team lokshahi

...तोपर्यंत हा लढा सुरु राहील; अंतरिम जामीन मिळाल्यानंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

किरीट सोमय्या आज मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला सत्ताधारी विरुद्ध भाजप हा संघर्ष आता टोकाला जाताना दिसतोय. भाजप नेते संजय राऊत आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. त्यातच आता किरीट सोमय्या यांनी विक्रांत बचाव मोहिमेअंतर्गत जमा केलेल्या निधीत गैरव्यवहार (Vikrant Scam) झाल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. या प्रकरणात निवृत्त ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी सोमय्यांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. या प्रकरणात आज सुनावणी पार पडली.

Kirit somaiya
राज ठाकरेंना पवारांचे जोरदार प्रत्युत्तर: म्हणाले, दोन दिवसांपुर्वीच महाराजांवर बोललो

किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते मागच्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर या प्रकरणात किरीट सोमय्या यांना हजर राहण्यासाठी नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र आज किरीट सोमय्या यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी याबद्दल ट्विट करताना पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या आज मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

Kirit somaiya
पुरंदरेंच्या सांगण्यावरुनच जेम्स लेनकडून गलिच्छ लिखाण

"अंतरिम जामीन मंजूर केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे आभार. ५७ कोटींच्या विक्रांत घोटाळ्याचे पुरावे सादर करू शकलेलं ठाकरे सरकार उघडं पडलं. जोपर्यंत ठाकरे सरकारचे डर्टी डझनला शिक्षा भेटत नाही, तोपर्यंत घोटाळेबाज महाराष्ट्र सरकारविरोधातील आमचा लढा सुरुच राहील" असं सोमय्या म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com